शिरपूर । तालुक्यातील बोराडी गावात स्टेट बँकेची शाखा असून रात्री चोरट्यांनी बँक फोडण्याचा प्रयत्न केला. चोरटे बँकेजवळ आल्यानंतर त्यांनी बँकेच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडायला सुरुवात केली.मात्र कुलुप तोडत असतांना बँकेतील सायरन वाजला. पकडले जावू या भितीने चोरट्यांनी धुम ठोकली. आणि चोरट्यांचा बँक फोडण्याचा स्टेट बँक फोडण्याचा प्रयत्न प्रयत्न फसला. बँक फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे आज सकाळी बँक उघडायला आलेल्या शिपायाच्या लक्षात आल्याने त्याने ही घटना वरिष्ठांना सांगितली.वरिष्ठांनी शिरपूर तालुका पोलिसांना घटेनची माहिती दिली. घटनास्थळी एपीआय खेडकर, श्वान पथक दाखल झाले होते. दुपारी उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती.