चिनोदा रोड परिसरातील घटना
तळोदा:येथील चिनोदा रोड परिसरातील दुकानाचे शटर व कुलूप तोडून दुकान फोडण्याचा प्रकार शनिवारी, 13 रोजी रात्री घडला. अज्ञात चोरट्यांनी शहरात एकाच रात्री अनेक दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.
चिनोदा रोडवरील महाराष्ट्र ग्रामीण बँक, दिपक समर्सिबल, वरद मेडिकल, स्वामी ऑटो पार्ट, अंजना प्रोव्हीजन या दुकानाचे कुलूप तोडण्यात आली.चोरट्यांना लॉक न उघडता आल्याने चोरी करता आली नाही. या दुकानाजवळ लावलेला कॅमेराही फिरविण्यात आला होता. आदर्श ऑटोमोबाइल येथून मोटर सायकलचे मॅकव्हील व ऑइलची पेटी, दुकानातील पाने आदी साहित्य चोरून नेले. तसेच महाजन स्टील ट्रेडर्स यांचे शटरचे कुलूप तोडण्यात आले.एक दिवस आधीही महाकाली ऑटो पार्ट गॅरेज येथून तीन पेट्या ऑईल गँरेजचे पाने चोरी करण्यात आली आहे. सुदैवाने अज्ञात चोरट्यांना मोठ्या प्रमाणावर चोरी करता आली नाही. याकामी तळोदा पोलिसांनी प्रत्यक्ष भेटून दुकानाची पाहणी केली. पुढील तपास करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
Prev Post