Copper Wire Worth 41 Thousand From Varadseem Shivar भुसावळ : तालुक्यातील वराडसीम शिवारातील शेतातून चोरट्यांनी शेतकर्यांच्या तब्बल 41 हजार 500 रुपये किंमतीच्या केबल कॉपर लंपास केल्याने शेतकर्यांमध्ये भीती पसरली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेती साहित्याच्या वाढल्या चोर्या
तक्रारदार भास्कर गिरधर वाणी (74, वराडसीम) व अन्य शेतकर्याच्या वराडसीम परीसरातील गट क्रमांक 714 मधील शेतातून चोरट्यांनी 9 रोजी सायंकाळी पाच ते 10 रोजीच्या सकाळी 7.30 दरम्यान संधी साधून 41 हजार 500 रुपये किंमतीची कॉपर केबल लांबवली. तपास नाईक गणेश पोपट गव्हाळे करीत आहेत.