चोरट्यांच्या अटकेनंतर घरफोडींचा उलगडा

0

भुसावळ । चोर्‍या-घरफोड्या झाल्यानंतर त्या बर्कींग करण्याचे प्रकार पोलीस दलात नवीन नाहीत तर चोरट्यांच्या मात्र मुसक्या आवळल्यानंतर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया शहर पोलीस ठाण्यात सुरू झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांनी भुसावळ शहर पोलीस ठाणे हद्दीत चार ते पाच चोर्‍या व घरफोड्या केल्याची माहिती आहे. त्यानुषंगाने पोलिसांकडून आरोपींकडून मुद्देमाल रिकव्हरीची प्रक्रिया सुरूदेखील असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वर्षभरापूर्वीची घरफोडी दाखल
शहर पोलीस ठाणे हद्दीतील चाळीसगाव बंगला भागातील रहिवासी व रेल्वे हॉस्पीटलमधील कर्मचारी शाहिजा जमाल यांच्या घरातून चोरट्यांनी 25 हजार रुपये किंमतीचा एलईडी, सहा हजार रुपये किंमतीच्या पाच ग्रॅमच्या कानातील रिंग, पाच हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी, चार हजार रुपये किंमतीचे पर्ल लॉकेट व दोन हजार रुपये किंमतीची बॅटरी लांबवली होती. 10 एप्रिल ते 10 जून 2016 दरम्यान ही चोरी झाली होती. शहर पोलिसात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला.