चोरट्यांच्या पोलिस कोठडीत वाढ

0

जळगाव । गोलाणी मार्केट परिसरात उभ्या चारचाकी वाहनाची काच फोडून भुसावळच्या नगरसेवक अमोल मनोहर इंगळे यांचे साडेतीन लाख रुपये लांबवल्याची घटना 10 मार्च रोजी घडली होती.

या गुन्ह्यात शहर पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने 14 मार्च योजी हाड्या उर्फ विकास राजू गुमाने, टारझन उर्फ बल्लू अरूण दहेकर (दोघे रा. कंजरवाडा) या दोन संशयितांना अटक केली. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत शनिवारी संपली. त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 21 मार्चपर्यंत कोठडी सुनावली अहे. सरकारतर्फे अ‍ॅड. आशा शर्मा यांनी काम पाहिले.