चोरट्यांना 16 जुनपर्यंत सुनावली पोलिस कोठडी

0

जळगाव। गणपती नगरातील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 1 लाख 52 हजार रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारीत पोबारा केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून त्यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, त्यांना न्यायालयाने 16 जुनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

गणपतीनगरातील रहिवासी दिपेश माधव खेतान यांच्या बंद घरातून चोरट्यांनी 4 ते 6 जुनदरम्यान 1 लाख 52 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता. त्यानंतर दिपेश खेतान यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी रामानंद पोलिसांनी राहूल नवल काकडे व सागर आनंद गायकवाड या दोन संशयित चोरट्यांना अटक केली आहे. पोलिसांनी दोन्ही संशयितांना बुधवारी न्यायाधीश के.एस.कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता दोघांना 16 जुनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. अविनाश पाटील यांनी कामकाज पाहिले.