चोरट्यांनी अंगणवाडीतील बालकांचा खाऊ लांबवला

Thieves’ Eye On Anganwadi : Nutrition Food Delayed मुक्ताईनगर : शहरातील अल्फल्हा नगराजवळ असलेल्या इदगाह जवळच्या अंगणवाडी क्रमांक 18 मधून चोरट्यांनी लहान मुलांचा खाऊ लांबवला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन हजार 850 रुपयांचे साहित्य लंपास
गुरुवार, 8 रोजी दुपारी एक वाजता अंगणवाडी बंद करण्यात आली. यानंतर शुक्रवारी सकाळी अंगणवाडी पुन्हा उघडली असता गव्हाची दहा पाकिटे, हरभर्याची दहा पाकिटे, तसेच मुगडाळ, साखर आदींची पाकिटे तसेच पातले, प्लेटा आदी साहित्य चोरट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी सुमारे 2850 रूपयांच्या वस्तू चोरून नेल्याचे दिसून आले.

या संदर्भात अंगणवाडी सेविका सुनीता विठ्ठल माळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुक्ताईनगर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास विनोद सोनवणे हे करत आहेत.