Copper wire worth 11 thousand from Phulgaon Shiwar भुसावळ : तालुक्यातील फुलगाव शिवारातील पोल क्रमांक बीटीपीएस 483 ते 484 दरम्यानची 11 हजार रुपये किंमतीची अंदाजे 60 मीटर ओव्हर हेड वायर चोरट्यांनी 5 रोजी लांबवल्याची बाब उघडकीस आली आहे.
वरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
या प्रकरणी वीज कंपनीचे कर्मचारी संदीप कृष्णा वाघ (40, दीपनगर कॉलनी, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार मधुकर भालशंकर करीत आहेत.