रावेर : तालुक्यातील केर्हाळे-कर्जोद रस्त्यावर असणार्या एका गोदामातून चोरट्यांनी एक लाख 63 हजार रुपये किंमतीच्या हळदीसह अन्य सामानावर डल्ला मारल्याने शेतकर्याला मोठा फटका बसला आहे. अज्ञात चोरट्यांविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. केर्हाळे बु.॥ येथील शेतकरी विनय सतीष पाटील यांचे केर्हाळे-कर्जोद रस्त्यावर शेतीचे सामान ठेवण्यासाठी गोदाम आहे. शेतकर्याच्या शेतात उत्पादीत झालेली 225 पोते हळद व रीओलिज कंपनीचे सीलबंद बंडल ठेवण्यात आले असता चोरट्यांनी 1 ऑगस्टच्या रात्री अज्ञात चोरट्याने गोदामाचे कुलूप तोडत हळदीच्या पोत्यांसह रीओलिज कंपनीच्या 21 हजार रुपये किमतीचे तीन सीलबंद ठिंबक नळ्यांच्या बंडल सात हजार रुपये किंमतीचा सीसीटीव्ही कॅमेर्याचा डीव्हिआर असा एकूण एक लाख 63 हजार रुपयांचा सामान लांबवला. विनय पाटील यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुध्द रावेर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस नाईक नीलेश चौधरी करीत आहेत.