चोरट्यांनी दहा हजारांचे प्रिंटर लांबवले

Thieves stole a printer worth ten thousand from Sri Shetra Manudevi यावल : सातपुडा निवासिनी मनुदेवी मंदिराच्या पायथ्याशी फोटोग्राफी करून उदरनिर्वाह करणार्‍या छायाचित्रकाराच्या मालकिचे दहा हजारांचे प्रिंटर चोरट्यांनी लांबवले. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात आरोपीचा शोध सुरू
तक्रारदार फिरोज हसन तडवी (42, आडगाव, ता.यावल) यांनी मनुदेवी धबधब्याच्या पत्री शेडमध्ये लोखंडी टेबलाच्या ड्रावरमध्ये प्रिंटर ठेवले असता चोरट्यांनी ते लांबवले. ही घटना 19 ते 20 ऑगस्टदरम्यान घडली. या प्रकरणी तडवी यांच्या तक्रारीवरून यावल पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार रवींद्र पाटील करीत आहेत.