चोरट्यांनी पळवले एटीएम मशीन

0

शिक्रापूर । पाबळ चौकातील पुणे-नगर रस्त्यापासून अगदी काही अंतरावर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये चोरी झाली असून एटीएम मशीनच चोरट्यांनी उचलून नेले. त्यामध्ये असलेल्या 15 लाख रुपयांच्या रोकडसह संपूर्ण एटीएम उचलून नेले आहे. बुधवारी सकाळी 11 वाजता एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी अधिकारी आले होते.

त्यावेळी त्यांना एटीएम सेंटरमध्ये मशीनच दिसले नाही, तसेच तेथील सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा तुटलेले दिसून आले. त्यांनतर त्यांनी कंपनीला माहिती दिल्यानंतर कंपनीने सिस्टीममध्ये तपासणी केली असता, ते मशीन पहाटे 4 वाजता बंद पडलेले दिसून आले या मशीनमध्ये 18 लाख 62 हजार रुपये शिल्लक होते. त्यामुळे चोरट्यांनी संपूर्ण एटीएम मशीनच उचलून नेले. शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून बँकेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.