चोरट्यांनी पानटपरी फोडून मुद्देमाल केला पोबारा

0

कजगाव – भडगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेली कजगाव पोलीस मदत केंद्राच्या रोडलगत हाकेच्या अंतरावर असलेल्या राजेंदृ भिला माळी यांचे कजगाव बसस्थानकाजवळ भोलेनाथ पान स्टॉल दुकान आहे. 6 ऑक्टोबर रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी पान दुकान फोडून वीस हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना रविवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास उघडकीस आला असून या घटनेमुळे परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापुर्वी देखील कजगाव शहरात अनेक छोट्या मोठ्या चोऱ्या झाल्या आहेत. भडगाव पोलीसात गुन्हे दाखल झाले, परंतू चोरट्यांना पकडण्यात अपयश आले आहे. यामुळे चोरी करणारे अज्ञात चोरट्यांचा कजगावसह परीसरात मुजोरा व दहशत वाढल्या सारखे दिसून मत असल्याने नागरीकांमधून बोलले जात आहे. पोलीस चौकीसमोर चोरी म्हणजे भडगाव पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारऱ्यांना मोठे आव्हान आहे.