नवरदेव-नवरीचे दागिन्यांसह रोख रक्कम केली लंपास
सुप्रिम कॉलनीतील घटना; एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल
जळगाव । सुप्रिम कॉलनीतील लग्नाच्या घरात नवरदेव-नवरी यांच्या सर्व दागिन्यांसह कपडे आणि रोकड लांबविल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आले. या घरफोडीत लग्नातील लागणार्या वस्तू लोखंडी पेटीत ठेवल्याने पेटीसहीत मोबाईल व कागदपत्रांची पेटीसह झालेल्या घरफोडीत एकुन 1 लाख 13 हजार रूपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. लग्नाचे साहित्य, दागिणे, कपडे आणि रोख रक्कम अशी एकुण 1 लाख 13 हजार रूपयांचा मुद्देमाल पार्टेशनच्या खोलीतून अज्ञात चोरट्यांनी नेल्याप्रकरणी सलिम शेख रज्जाक यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, औद्योगिक वसाहतीच्या बाजूला असलेल्या सुप्रिम कॉलनी, इदगाह मैदानाजवळ राहणार्या शेख रज्जाक शेख गनी (वय-50) रा. यांच्या मुलगा सलीम शेख रज्जाक शेख याचे रविवारी 8 एप्रिल रोजी लग्न असून या कार्यासाठी घरी पाहुणे मंडळींची मोठ्या प्रमाणावर वर्दळ आहे. तर शनिवारी हळदीचा कार्यक्रम असल्याने घराला रंगकाम करण्याचे देखील काम सुरू होते. त्यामुळे लग्नातील सामान ठेवण्यासाठी घराच्या मागील बाजूस असलेले पटेल यांचे पार्टीशनचे घर भाड्याने घेतले होते. लग्नाचे सर्व साहित्य पार्टीशनच्या खोलीत ठेवलेले होते. शुक्रवार 6 एप्रिल रोजी लग्नाचे साहित्य ठेवलेल्या खोलीला कुलुप लावून जेवण केले. उन्हाळा असल्याने घरातील शेख रज्जाक शेख गनी, त्यांचे मुले सलीम, नुरा, रहिम, कलीम, आदील व शादल असे सर्वच महिला, पुरुष गच्चीवर झोपले होते. सकाळी साडे पाच वाजता पाऊस सुरु झाल्याने सर्व जण उठून खाली आले असता सलिम शेख यांचा लहान भाऊ रहिम शेख यांनी पार्टीशनच्या खोलीतील सामान अस्तव्यस्त स्वरूपात असल्याचे सांगितले. त्यानंत पार्टीशनच्या खोलीचा कडी कोयंडा तोडले होते. लग्नाचे साहित्य व रोख रक्कम ठेवलेल्या पेटी अज्ञात चोरट्यानी फोडून लंपास केले.
सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास
शेख रज्जाक शेख गनी यांच्या घरात लग्न असल्याने नातेवाईकांची गर्दी होती. मात्र एवढे सर्वजण असतांना घरात चोरी झाली कशी असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पार्टेशनच्या खोलीतील लोखंडाच्या पेटीत ठेवलेले 90 हजार रूपये रोख, 7 हजार रूपये किंमतीचे मणी मंगळसुत्राची सोन्याची पोत, 6 हजार रूपये किंमतीचे कानातील टापसे आणि 5 हजार रूपये किंमतीचे नविन कपडे असा एकुण 1 लाख 8 हजार रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. तर त्याच्या गल्लीत राहणारे कलीम शेख ख्वॉजा यांचा 4 हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल आणि 1 हजार रूपये रोख रक्कमही लंपास झाल्याचे समोर आले आहे.
एमआयडीसी पोलिसात गुन्हा
त्यात दोन मंगळसूत्र, कानातील रिंगा, पैंजन, मुलीची पोत गायब होत्या. प्रत्येकी तीन हजार रुपये किमत अलेले 17 ड्रेस असे एकुण रोख रक्कम अशी एकुण 1 लाख 13 हजार रूपयांचा मुद्देमाल पार्टेशनच्या खोलीतून अज्ञात चोरट्यांनी नेल्याप्रकरणी सलिम शेख रज्जाक यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गु.र.नं. 98/2018, भादवी 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढीत तपास अतुल वंजारी करित आहे.