चोरट्यांनी लांबविला विद्यार्थींनीचा मोबाईल

0

जळगाव। मोटारसायकलवर आलेल्या दोन चोरट्यांनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थीनीचा मोबाईल हातून हिसकावून चोरून नेल्याची घटना बुधवारी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास रामानंदनगर परिसरात घडली. दरम्यान, याप्रकरणी तरूणीने रामानंदनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांच्याविरूध्द तक्रार दाखल केली आहे.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थींनी मानसी राजेश चौधरी ही रामानंनगर परिसरातील कॅफे एमएच 19 जवळून जात होती. त्यावेळी मागून मोटारसायकलवरून आलेल्या दोन चोरट्यांनी तिच्या हाताला हिसका देत तिच्या हातातील मोबाईल चोरून नेला. विद्यार्थींनीने आरडा-ओरडा केली मात्र, त्या ठिकाणी कुणी नसल्याने चोरटे पसार होण्यास यशस्वी झाले.