चोरट्यांनी लांबविल्या डंपरमधून बॅटर्‍या

0

जळगाव। चिंचोली येथे दोन डंपरमधून तीस हजार रुपये किंमतीच्या तीन बॅटर्‍या अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना शनिवारी उघडकीस आली असून याप्रकरणी डंपर मालकाने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिंचोली येथील वासुदेव चिंधू लाड यांचे एमएच.19.झेड.4703 व एमएच.15.सीके.6916 क्रमांकाचे दोन डंपर असून या डंपरमधून शुक्रवारी सायंकाळी अज्ञात चोरट्यांनी तीन एक्साईड कंपनीच्या बॅटर्‍या चोरून नेल्या. सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास वासुदेव लाड यांना डंपरमधून बॅटर्‍या चोरीला गेल्याचे लक्षात आले. यानंतर शनिवारी एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठत अज्ञात चोरट्याविरूध्द लाड यांनी तक्रार दाखल केली असून त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांचा पोलिस शोध घेत आहेत.