चोरट्याकडून इनोव्हा कार हस्तगत

0

जळगाव । पुणे-मुंबई येथून भाड्याने महागड्या कार आणुुन त्यांच्या जळगाव जामनेर रोडवर नेवुन तेथून चालकाला उतरवुन वाहने पळवल्याचे तीन गुन्हे रामानंदनगर पोलिस ठाण्यात दाखल आहेत. या गुन्ह्यात एका संशयीतांला पोलिसांनी अटक करुन आणले असुन तिन पैकी एका गुन्ह्यातील इन्व्होवा कार अटकेतील संशयीताने काढून दिली आहे.पुर्वीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावल्यावर आज पुन्हा संशयीताला वेगळ्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले आहे आहे.

बनावट नंबर टाकून विकली कार
निसार शेख शब्बीर (वय 27) यांच्या मालकीची नवी इन्होवा कार (एमएच 12- एफके 5275) 4 एप्रिल 2017 ला जळगाव- जामनेर रस्त्यावर चालकास उतरवून सय्यद शकील सय्यद युसूफ यांने पळवून नेली होती. या कार संदर्भात तपासाधिकारी एन.बी.सुर्यवंशी, यांच्या पथकाने पुण्याहून ताब्यात घेतली आहे. पोलिसांनी जप्त केलेली इन्व्होवा कार वर बनावट नंबर म्हणुन (एमएच.18,व्ही.9695) हा बनावट नंबर टाकण्यात आला असुन तीची अवघ्या नव्वद हजारात विक्री करण्यात आली होती. पुणे येथुन जळगाव पोलिसांनी हि कार ताब्यात घेतली असुन जळगावला आणली आहे. आज पुन्हा पथक पुण्याकडे रवाना झाले असुन अटकेतील संशयीताचा साथीदारास अटक करुन जळगावी आणण्यात येणार असल्याचे तपासाधिकारी नाना सुर्यवंशी यांनी सांगीतले.

न्यायालयीन कोठडीत रवानगी
नवी मुंबई परिसरातील वाशी येथून जामनेर येथे लग्नास जात असल्याचे सांगून दोघांनी कार (जीजे 09 बीडी-1817) भाड्याने घेतली होती. त्यानंतर 29 डिसेंबर 2016 रोजी कार विटनेर गावाजवळ आल्यानंतर रात्री 12 वाजता चालकाला खाली उतरवून दोघांनी कार औरंगाबादच्या दिशेने पळवून नेली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी 19 मे रोजी सय्यद शकील सय्यद युसूफ (वय-37, रा. जवाहर नगर, इक्बाल चौक, जि.बुलढाणा) याला अटक केली होती. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत बुधवारी संपली. त्याला न्यायाधीश चौधरी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी त्याला दुसर्‍या गुन्ह्यात ताब्यात मिळण्यासाठी केलेला अर्ज न्यायाधीश चौधरी यांनी मंजूर केला आहे.

यांना केली आहे अटक
नवी मुंबई परिसरातील वाशी येथून जामनेर येथे लग्नास जात असल्याचे सांगून दोघांनी कार (जीजे09 बीडी-1817) भाड्याने घेतली होती. त्यानंतर 29 डिसेंबर 2016 रोजी कार विटनेर गावाजवळ आल्यानंतर रात्री 12 वाजता चालकाला खाली उतरवून दोघांनी कार औरंगाबादच्या दिशेने पळवून नेली. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात औद्योगीक वसाहत पोलिसांनी 19 मे रोजी सय्यद शकील सय्यद युसूफ (वय-26, रा. जवाहर नगर, इक्बाल चौक, जि.बुलढाणा) याला अटक केली होती. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी त्याला दुसर्‍या गुन्ह्यात अटक केली आहे.