चोरट्याकडून 18 लाखांचा ऐवज जप्त

0

पुणे । नाकाबंदी दरम्यान वारजे माळवाडी पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतलेला इसम सराईत चोरटा निघाला. त्याने शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत दिवसाढवळ्या 11 घरफोड्या केल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा 18 लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

प्रणव विकास चांदगुडे (वय 19, रा. शिवणे) असे त्याचे नाव आहे. कर्वेनगर परिसरात केलेल्या नाकाबंदी दरम्यान 26 ऑगस्ट रोजी त्याला ताब्यात घेण्यात आले होते. यावेळी त्याच्याजवळील सॅकची तपासणी केली असता त्यामध्ये लोखंडी रॉड, लेडीज पर्स, चांदीचे तीन पैंजण व रोख 7 हजार रुपये आढळले होते. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने 11 घरफोड्या केल्याचे कबूल केले.