चोरट्याने हातचलाखीने वृध्द महिलेची पोत लांबविली

0

जळगाव । बारा वर्षानंतर एकाला मुलगा झाला असून तो मंगळसुत्र वाटप करीत आहेत. त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत पुढे चला सांगत एकाने वृध्द महिलेला सोबत घेवून जात गळ्यातील मंगळसुत्र पर्समध्ये ठेवायला लावत नंतर पिशवित ठेवायला सांगितले. यानंतर हातचालाकीने त्याने वृध्द महिलेला बोलण्यात गुंतवून पिशवितील पर्स चोरून नेली. ही घटना सोमवारी दुपारी 12 वाजता गणेश कॉलनी रिक्षा स्टॉप परिसरात घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूध्द जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजीपाला खरेदीसाठी आली वृध्द महिला
गणेश कॉलनी येथील प्लॉट नंबर 93 मध्ये कुसुमबाई भास्कर वाणी (वय 78) ह्या कुटूंबासोबत राहतात. कुसूमबाई वाणी ह्या नेहमी सायंकाळी भाजीपाला खरेदी करण्यासाठी जातात मात्र आज सोमवारी दुपारी 12 वाजता ते गणेश कॉलनी रिक्षा स्टॉप परिसरात भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेल्या. भाजीपाला खरेदी केल्यानंतर इलेक्ट्रीक डिपीजवळ उभा असलेला एक अज्ञात तरूण वृध्द महिलेकडे आला. पूढे चला एकाला बारा वर्षानंतर मुलगा झाला असून तो मंगळसुत्र वाटप करत आहे असे वृध्द महिलेला सांगून एका गल्लीत घेवून जाऊ मोटारसायकल उभ्या असलेल्या ठिकाणी बसवले.

पिशवीत ठाकायला लावली पर्स
दहा-पंधरा मिनीटं बसविल्यानंतर त्याने वृध्द महिलेला गळ्यातील मंगळसुत्र पर्समध्ये ठेवून द्या ते नवीन देणार आहेत. यानंतर त्यांनी पर्स पिशवीत ठेवायला सांगितले. वृध्द महिलेने पर्स पिशवित ठेवताच त्याने पिशविला गाठ मारण्यासाठी मांगविली. यानंतर महिलेला बोलण्यात गुंतवून तरूणाने हातचालाकीने पिशवितून पर्स काढून त्यातील 300 रुपये रोख व 50 हजार रुपये किंमतीची दोन तोळ्यांची पोत त्या तरूणाने चोरून नेली.

हिप्नोटॉईज करून पर्स लंपास
तरूण तेथून निघाल्यानंतर वृध्द महिलेस शुध्द येताच त्यांनी त्यांची पिशवित पर्स शोधली असता मिळून आली नाही. यानंतर तरूणाने बोलण्यात गुंतवून पर्स चोरून नेल्याचे त्यांचे लक्षात आले. कुसूमबाई वाणी यांनी लागलीच जिल्हा पेठ पोलिस स्टेशन गाठत अज्ञात चोरट्याविरूध्द पैसे व मंगळपोत फिर्याद दाखल केली त्यानुसार चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणीचा पूढील तपास पोहेकॉ. भटू नेरकर करीत आहेत.