भुसावळ- तालुक्यातील चोरवडजवळ असलेल्या हॉटेल माऊलीमध्ये खाजगी सिलिंडरचा बेकायदा वापर सुरू असताना तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत तीन हजार रुपये किंमतीचे दोन सिलिंडर जप्त केल्याची कारवाई शुक्रवारी करण्यात आली. या प्रकरणी पोलिस कर्मचारी विठ्ठल शंकर फुसले यांच्या तक्रारीवरून हॉटेल मालक अजय संजय विसपुते (23, देना नगर, भुसावळ) यांच्याविरुद्ध ईसी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. शनिवारी भुसावळ न्यायालयात त्यांना हजर केल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक गजानन पवार व तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचार्यांनी ही कारवाई केली. तपास उपनिरीक्षक दिलीप पाटील करीत आहेत.