चोरीचा टिव्ही विक्रीसाठी गेले अन् पोलिसांनी आवळल्या तिघांच्या मुसक्या

0

गुन्हा दाखल होताच अवघ्या 12 रामानंदनगर पोलिसांनी लावला छडा ; रोख रक्कम, दागिण्यांसह टीव्ही असा 74 हजाराचा लांबविला होता एैवज

जळगाव- खंडेरावनगरातील टिपू सुल्तान चौक येथील सगिर सलीम देशमुख याच्या शेतकर्‍याचे घरातून चोरट्यांनी एलईडी टीव्ही, 40 हजार रुपये रोख, सोन्याच्या 5 ग्रॅमच्या सोन्याच्या दोन अंगठ्या असा एकूण 74 हजाराचा मुद्देमाल लांबविल्याची घटना 140 जुलै रोजी घडली होती. सोमवारी याप्रकरणी गुन्हा दाखल होताच अवघ्या 12 तासात रामानंदनगर पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावून खंडेराव नगरातील दोघांसह एक अशा तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यातील एलईडी टीव्ही जप्त करण्यात आला आहे. हाच चोरीचा टिव्ही विक्रीसाठी गेले अन् त्याची बातमी मिळाल्यावर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.

काय घडली होती घटना
खंडेराव नगरातील टिपू सुल्तान चौक येथे सगिर सलीम देशमुख हे आई, वडील, भाऊ व पत्नी मुलाबाळांसह वास्तव्यास होते. शेती करुन ते उदरनिर्वाह भागवितात. बहिणीचे लग्न झाल्यानंतर 30 जून 2019 पासून सगीत हे कुटुंबियांसह देशमुख वाडा, बोरनार. ता.जळगाव येथे वास्तव्यास आहेत. 4 जुलै रोजी दुपारी 2 वाजता सगीर हे खंडेराव नगर टिपू सुल्तान चौकातील घरी आले. त्यांनी घराला कुलूप लावून पुन्हा ते बोरनार येथे निघून गेले. 10 जुलै ला पुन्हा खंडेराव नगरातील घरी आले असता त्यांना कुलूपाचा कोयंडा तुटलेला, घरात कपडे व सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला. व पत्नी हिची पर्स पडलेली दिसली. तसेच घरातील टिव्हीही जागेवर नव्हता. शेजारी हमीदा खाला व नसरुन बी मोहसीन खान यांना विचारपूस केली. चोरट्यांनी घरातील एलईडीटीव्ही, 40 हजार रुपये रोख व 24 हजाराच्या दोन सोन्याच्या अंगळ्या असा 74 हजाराचा एैवज लांबविला होता. चोरीची खात्री झाल्यावर 5 ऑगस्ट रोजी सगीर यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

खंडेराव नगरातीलच निघाले चोरटे
पोलीस उपनिरिक्षक रोहिदास ठोंबरे यांना संशयित हे पिंप्राळा तसेच खंडेराव नगर परिसरातील असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरिक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिदास ठोंबरे, गुन्हे शोध पथकातील रवी नरवाडे, भूषण पाटील, अतुल पवार, संतोष पाटील याच्या पथकाने 6 दुपारी 3 वाजेच्या सुमारास इरफान उर्फ इप्पो युसूफ पठाण वय 22, शरीफ शेख शफी उर्फ फैय्याज वय 22 दोन्ही रा.खंडेराव नगर, शोएब शेख युनूस वय 20 रा. आझाद नगर, पिंप्राळा या तिघां संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून 10 हजार रुपये किंमतीची एलईडी टीव्ही हस्तगत करण्यात आली आहे. पुढील तपास सुरु आहे.