चाळीसगाव – चाळीसगाव पंचायत समिती समोर स्टॉलवर मूर्ती घेण्यासाठी येणार्या गणेश भक्तांचे गर्दीचा फायदा घेवुन खिसे चाचपडत असतांना राजेश नंदु पारधी (24) हा आढळल्यांनतर त्यास चाळीसगाव पोलीसांनी ताब्यात घेवुन त्याच्या वर्तणुकीत सुधारणा व्हावी व लोकांच्या मालमत्तेचे संरक्षण व्हावे म्हणून त्याला तहसीलदा यांच्याकडे हजर केले. त्याच्यावर सीआरपीसी 109 प्रमाणे चॅप्टर केस भरण्यात आली. डी बी चे हवालदार बापूराव भोसले व पथकाने ही कारवाई केली.