चोरीची मोटारसायकल भुसावळ पोलिसांनी केली मूळ मालकाला परत

0

भुसावळ- बाजारपेठ पोलिसांना गस्तीदरम्यान 50 हजार रुपये किमतीची बजाज पल्सर मोटार सायकल बेवारस आढळली आली होती. या मोटारसायकलच्या इंजिन व चेसीस नंबरवरून मोटारसायकल मालकाचा शोध लावण्यात आला तर संबंधित मोटारसायकल चालकाने वाहन चोरी झाल्याबाबत दादर नगर हवेली येथील सेलवासा पोलिसात 16 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आल्याची बाब पुढे आली आहे. त्यानंतर 31 रोजी ही मोटारसायकल ही दादर नगर हवेली, सेलवासा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनखाली उपनिरीक्षक सूर्यवंशी, किशोर महाजन, विकास सातदिवे यांच्या उपस्थितीत वाहन देण्यात आले.