चोरीची वाहने विकणारा सराईत चोरटा अटकेत

0

जळगाव। मुंबई, पुणे येथील महागड्या कार चोरीप्रकरणात तिघा संशयितांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या गुन्ह्यात आजवर पोलिसांनी सात संशयीत निष्पन्न केले असुन उर्वरीत संशयीतांना अटक होणे अद्यापही बाकी आहे. अटकेतील तिघा संशयीतांना यापुर्वी एक इन्व्होवा कार काढून दिली होती. उर्वरीत दोन कार अद्यापही मिळाल्या नसुन त्यांच्यासह इतर संशयीतांचा शोध सुरु असतांना हातो हात कार विकणार्‍या मुख्य संशयीताच्या भावाला पोलिसांनी औरंगाबाद येथून अटक केली आहे. पुणे येथून ताब्यात घेतलेला मास्टरमाईंड आरटीओ एजंट सय्यद शकील सय्यद सुयूफ (रा. बुलडाणा) यासह सय्यद कुर्बान, आबेदखान ऊर्फ गुड्डु नासिर खान (दोघे रा. औरंगाबाद) यांच्या कोठडीची मुदत संपल्यावर त्यांची कारागृहात रवानगी झाली. या प्रकरणात आतापर्यंत सात संशयितांची नावे समोर आली असून, एजाज जलालुद्दिन काजी, नाजीम बेग ऊर्फ नम्मू , बबलू ऊर्फ निजाम शेख युसूफ, सय्यद समीर सय्यद युसूफ या उर्वरीत संशयीतांचा पोलिस शोध घेत असुन तपासाधिकारी एन.बी.सुर्यवंशी यांच्या पथकाने सय्यद समीर याला अटक केली असुन त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले, न्या. बी.डी.गोरे यांच्या न्यायालयाने संशयीतास दोन दिवस पोलिस कोठडीत रवाना केले. सरकारपक्षातर्फे ऍड. अनील गायकवाड यांनी कामकाज
पाहिले.

हातोहात वाहन विक्रीत पटाईत
गुन्ह्यातील मुख्य संशयीत सय्यद शकील सय्यद युसूफ याचा लहान भाऊ समीर हा, चोरीच्या वाहनांच्या विक्रीत पटाईत आहे. बनावट कागदपत्रे दाखवुन वाहन उत्तरप्रदेश, नेपाळ पर्यंत कार विक्रीचे त्याचे नेटवर्क आहे. शकीलने चोरुन आणलेली कोणतीही कार एक दिवसापेक्षा जास्तवेळ तो घरी राहुन देत नाही. चोरीची कार घेवुन शकील घरी पोचलाच की, समीर बनावट कागदपत्रे नंबरप्लेटसह तयार असतो, शकील घरात घुसताच तो चावी घेते नंबरप्लेट बदलून लगेच हातोहात त्या कारचा सौदा करतो.