बंगाली कारागिराकडे तपासल्यावर लपविले होते कोल्हे हिल्स परिसरात डे्रनेजच्या पाईपात
जळगाव : शहरातून दुचाकी चोरुन तिच्या सहाय्याने पुण्यातील कोथरुड शहर गाठले. लाखो रुपयांच्या आमिषाने येथील पेठे ज्वेलर्समध्ये रिव्हॉलरच्या धाकावर 10 लाख 19 हजार 600 रुपयांचे सोन्याचे दागिने लुटून नेले. संशयित बडतर्फ पोलीसासह त्याच्या साथीदाराने टाकलेला हा दरोडा फेल झाला असून लुटलेले दागिणे सोन्याचे नव्हे तर बेंटेक्सचे असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
मालकाच्या सतर्कने दीड किलो सोने सुरक्षित
कोथरुडच्या दरोड्यात जळगाव पोलिसांनी शनिवारी सुशील अशोक मगरे (रा.पहूर, ता. जामनेर) व त्याचा साथीदार नीतीश उर्फ अमित प्रसाद चौधरी (20, रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव, मुळ रा.बिहार) या दोघांना बडोदा येथून अटक केली. दोघांना गुन्ह्यात वापरलेल्या तसेच शहर पोलीस ठाण्यात दाखल दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्यांनी कोथरुडच्या पेठे ज्वेलर्समधून लुटलेले दागिणे रविवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केले आहे. दरोड्यादरम्यान पिस्तुलचा धाक दाखवत असताना ज्वेलर्समधील कामगारांनी बेंटेक्सचे दागिणे दोघांना काढून दिले तर खरे दीड किलो सोने पायाच्या खाली ठेवले होते, ते सुरक्षित राहिले आहे.
पोलिसांकडून ड्रेनेज पाईपात लपविले सोने हस्तगत
सुशील मगरे व नीतीश या दोघांनी जळगाव शहरात आल्यानंतर सराफाकडे काम करणार्या बंगाली कारागिराकडे नेले होते. तेव्हा हे सोने बनावट व बेंटेक्सचे असल्याचे निष्पन्न झाले, त्यामुळे दोघांनी त्यांच्या संपर्कात आलेला वॉचमन याच्या कोल्हे हिल्स परिसरातील फार्म हाऊसनजीकच्या घरातील ड्रेनेजच्या पाईपात लपविले होते. पोलीस निरीक्षक बापू रोहोम, सहायक फौजदार चंद्रकांत पाटील, विजय पाटील, दिनेश बडगुजर व नरेंद्र वारुळे यांच्या पथकाने घरझडती घेऊन घरातील व्यक्तीला बोलते केले असता त्याने रुमालात बांधून ठेवलेले हे सोने काढून दिले.त्यात 51 हजार, 6 पाटल्या व 11 मोतीच्या बांगड्यांचा समावेश आहे.
पोलिसांकडून हस्तगत दागिण्यांची सराफाकडून तपासणी
त्यानंतर पोलिसांनी हे सोने सराफाकडे तपासणीसाठी नेले असता बनावटच आढळून आले. त्याचे प्रमाणपत्र घेऊन हे सोने तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, बडोदा येथेही मगरेकडे दोन हार आढळून आले ते देखील बनावटच निघाले, त्याचेही प्रमाणपत्र पोलिसांनी घेतले. दरम्यान, पिस्तुल मात्र बनावट नाही तसेच चॉपर व तीन काडतूस मगरेजवळून जप्त करण्यात आले आहे.
अन् कहानी ऐकताच खाकीलाही फुटला पाझर
सुशील मगरे याने कोल्हे हिल्स पसिरात संपर्कात असलेल्या व्यक्तीच्या घरात दागिणे लपविले होते. या घरात चौकशी केल्यावर अधिकार्यांसह कर्मचार्यांसमोर घरातील चिमुकलीची भावनिक कहानी समोर आली. दाम्पत्यांच्या पोटी जन्माला आलेल्या चिमुरडीच्या डोळ्यात जन्मत:च फुल असल्याने भविष्यात ती अंध होण्याची भीती पाहता सहायक फौजदार चंद्रकांत पाटील व दिनेश बडगुजर या दोघांनी चिमुरडीच्या शस्त्रक्रियेची जबाबदारी उचलली, विजय पाटील यांनी दहा हजार रुपये चिमुरडीच्या आईला दिले. तर निरीक्षक रोहोम यांनी भविष्यातही सर्व प्रकाराचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. भावनिक कथेने वर्दीतील अधिकार्यासह कर्मचार्याच्या डोळे पाणावले होते. तर पथकाची माणुसकी पाहून दाम्पत्यालाही गहिवरुन आले.
बडतर्फ पोलिसांने चार राज्यात पथकाला दिला चकवा
सुशील मगरे व त्याचा साथीदार पुण्यातील सराफ दुकान व शिवाजी नगरातील एका ठिकाणी तसेच दिल्ली येथे मोबाईल सीमकार्ड घेताना सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तसेच सीमकार्ड घेताना दिल्लीचा बनावट पत्ता देवून आधारकार्ड मात्र जळगावचे दिले होते. दरम्यान, हे सर्व फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र व मध्य प्रदेश या चार राज्यात मगरे याने जळगाव पोलिसांना चकवा दिला.