भुसावळ । रेल्वे स्थानकाच्या आऊटर भागात रेल्वेत चोरी करण्याच्या उद्देेशाने दडून बसलेल्या टोळीच्या चार सदस्यांना आरपीएफ पोलिसांनी पकडून जेरबंद केले असून त्याच्याकडून चोरी दरोड्यात वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले. यावेळी यातील एक संशयीत पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. गुरूवार 4 मे रोजी पहाटे 4.55 वाजता करण्यात आली. आरपीएफ पोलीसांनी संशयितांचा पाठलाग केला असता एक आरोपी पडून जखमी झाला आहे. चौघांविरोधात आरपीएफ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेल्वे आऊटर भागात गाडीची साखळी ओढून गाडीत लूट करण्याच्या प्रयत्नाची मिळाली होती माहिती गाडी क्र 12628 अप कर्नाटक एक्सप्रेसची रेल्वे आऊटर भागात गाडीची साकळी ओढून गाडीत लुट करण्याच्या प्रयत्नात आऊटर भागात 5-6 दरोडेखोर लपून बसल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. पोलीसांनी यावेळी पंचासह रेल्वे पुलाच्या आडोशाला दडून बसलेल्या दरोडेखोरांना घेराव टाकल्यानंतर दरोडेखोरांनी घटनास्थळारून पळ काढला मात्र पोलिसांनी दरोडेखोरांचा पाठलाग करून चौघांना ताब्यात घेतले, संशयीतांमध्ये इम्रान उर्फ इमाम पिंजारी, (वय 19), अमिन इमाम पिंजारी (वय 25), इमाम हसन पिंजारी (वय 62. तीघे रा.फुले नगर भुसावळ), धिरज उर्फ सन्नाटा लक्ष्मण चावरीया (वय 20, रा. आठ खोली, भुसावळ) यांचा समोवश आहे. यातील धिरज हा पोलिसांच्या पाठलागात रेल्वे रुळाजवळील खड्यात पडून त्याच्या डाव्या तळहातावर दुखापत झाली. पळून गेलल्या साथीदाराचे नाव अहमद अटक राह (रा. मच्छीवाडा, जाममोहल्ला, भुसावळ) असल्याचे सांगण्यात आले. तो अंधाराचा फायदा घेऊन महात्मा फुले नगरातील झोपडपट्टीतून फरार झाला.
रॉड, चाकू, केले हस्तगत
ही कारवाई रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त अजय दुबे, आरपीएफ निरीक्षक विनोदकुमार लांजीवार,यांच्या मार्गदर्शनाखाली एसएसआय लवकुश वर्मा, हे. कॉ. सुनील सोनवणे, काँ.नावेद शेख, दीपक शिरसाठ, विनोद जेठवे,बी.आर.अंभोरे यांनी केली.चारही आरोपींची झडती घेतली असता इम्रान जवळून 10 फूटांचे 3 रॉड, अमिन जवळ 17 इंचांचा मोठा जूना चाकू, इमाम जवळ दोन मिरचीच्या पुड्या,धिरज जवळ एक स्टिलचे फायटर अशा वस्तू जप्त करण्यात आल्या. आऊटर भागात थांबणार्या रेल्वे गाड्यांमधून प्रवाशांच्या लेडीज पर्स, मोबाईल, ट्रॉली बॅग अशा सामानांची चोरी करत असल्याचे कबुल केले आहे.