यावल- गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी व हातचलाखीने चोरी करण्याच्या उद्देशाने फिरणार्या चार महिलांना यावल पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले. शुक्रवारी यावलचा आठवडे बाजार असल्याने जळगावातील या महिला शहरात आल्या होत्या. यावलच्या आठवडे बाजारात मोठी गर्दी होते. याच गर्दीचा गैरफायदा घेऊन सोनसाखळी लांबवणे, खिसा कापणे, मोबाईल लांबवणे असे प्रकार घडतात. याच प्रकारे चोरीच्या उद्देशाने शहरातील बसस्थानक व नंतर भुसावळ टी-पॉईंट येथे फिरणार्या जळगावच्या हक्षहविठ्ठल नगरातील रहिवासी लताबाई रमेश कसबे (45), प्रमिलाबाई रमेश उमव (45), कासाबाई ईश्वर उमव (50) आणि कांचन काशीनाथ हातगडे (45) यांना पोलिस निरीक्षक डी.के.परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजेंद्र पाटील, सिकंदर तडवी, ज्योती खराटे यांनी शिताफीने पकडले. त्यांच्यावर न्यायदंडाधिकार्यांच्या अधीन राहून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तपास हवालदार गोरख पाटील करत आहे.