जळगाव । धरणगाव पोलिस स्थानकात चोरीच्या गुन्ह्यातील अटकेत असलेला आरोपीचा जळगाव जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार घेत असतांना त्याचा मृत्यू झाला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष बंडू भिल (वय-42, रा. वराड) यांने वराड गावात चोरी केल्याप्रकरणी 27 ऑक्टोंबर रोजी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या गुन्ह्यावर तपास सुरू होता. आरोपीच्या शरीरातील शुगर वाढल्याने जळगाव जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून जिल्हा रूग्णालयात त्यांच्या नातेवाईकांनी एकच गोंधळ घातला. दरम्यान, धुळे येथे इनकॅमेरा शवविच्छेदन व्हावे अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.