रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रुक येथे नोव्हेंबर 2017 मध्ये घडली होती घटना
निंभोरा- रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रुक येथे 26 नोव्हेंबर 2017 रोजी चोरीची घटना घडली होती. या घटनेत तीन लाख 57 हजार 310 रुपये किंमतीचे त्यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने व रोख रुपये चोरीला गेले होते. याप्रकरणी रावेर न्यायालयाने आरोपीस दोन वर्षाची शिक्षा सुनावली. खिर्डी येथील भास्कर विठ्ठल पाटील यांच्या घरात संशयीत अनिसखान रईसखान (रा.ऐनपूर, ता.रावेर) याने 26 नोव्हेंबर 2017 चे सकाळी 8.30 ते संध्याकाळी पाच वाजेदरम्यान चोरी केली होती.यामध्ये तीन लाख 57 हजार 310 रुपये किंमतीचे त्यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने व रोख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. या प्रकरणी संशयीत आरोपी यास 30 नोव्हेंबर 2017 रोजी अटक करून त्याच्या ताब्यातून चोरीच्या घटनेतील मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.तर या प्रकरणी आरोपीविरूध्द रावेर न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.त्यानुसार रावेर न्यायालयाने आरोपी यास दोन वर्ष व एक हजार रुपये दंड तसेच दोन वर्ष व एक हजार रुपये दंड अशी आरोपीस दोन वर्षांचा समिश्र कारावासाची व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावलीे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी रायसिंग फैजपूर भाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखडे, पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर चव्हाण, व पोलीस हवालदार ज्ञानेश्वर पाटील यांनी केला होता.