चोरीच्या गुन्ह्यातील तीन संशयीत नंदुरबार एलसीबीच्या जाळ्यात

नंदुरबार : नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यांतर्गत कोठली, ता.नंदुरबार व नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यांतर्गत घोटाणे, ता.नंदुरबार या दोन्ही धाडसी चोरीच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

दोन ठिकाणी झाल्या धाडसी चोरी
9 मार्चला रात्री साडेअकरा ते पहाटे पाचच्या सुमारास उपनगर पोलिस ठाणे हद्दीतील कोठली गावातील शशिकांत अरविंद पाटील यांच्या शेतातील घरातील 27 हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल, 50 हजार रुपये रोख चोरीस गेले होते. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा झाला होता.
दुसर्‍या घटनेत 9 मार्चला घोटाणे (ता.नंदुरबार) येथील तुळशीराम दगा पाटील यांच्या घराजवळ लावलेली दुचाकी, तीन हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरी झाले होता. नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुजरातमधून आरोपी जाळ्यात
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने निलगिरी सर्कल लिंबायत सुरत गुजरात येथून धर्मा भोसले (जामदा, ता.साक्री, ह.मु.सुरत) व नानु डींग भोसले यांनी (घोटाणे, ता.नंदुरबार) यांना ताब्यात घेतले. त्यांनी मुद्देमाल काढून देत गुन्हा कबूल केला. दरम्यान, कोठली येथील चोरी प्रकरणी वेडापावला. ता.नंदुरबार येथील अक्षय शांतू वळवी यास वेडापावला येथून अक्षय अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून 27 हजार किमतीचे तीन मोबाईल हॅन्डसेट जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर करीत होते.