धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकी चोरट्याला अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली. मीनहाज मोहम्मद रमजान अन्सारी (तिरंगा चौक, धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या ताब्यातून 25 हजार रुपये किंमतीची चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
अरुण वामन लोखंडे (62, रा.गल्ली नं.4, धुळे) यांची घराजवळ लावलेली दुचाकी (क्र.एम.एच. 18 ए.जी. 3730) 9 ते 10 मे दरम्यान अज्ञात चोरट्याने लांबवली होती. या प्रकरणी आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयाचा समांतर तपास एलसीबीकडुन सुरु असतांना हा गुन्हा तिरंगा चौकातील मीनहाज मोहम्मद रमजान अन्सारी याने केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास गुरुवारी मध्यरात्री अटक करण्यात आली. आरोपीने वरील दुचाकीच चोरीची कबुली दिली.
यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाळासाहेब सुर्यवंशी, हवालदार प्रकाश सोनार, नाईक योगेश चव्हाण, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी यांच्या पथकाने केली. दरम्यान, संशयीताला आझादनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.