चोरीच्या दुचाकीसह भामटा जिल्हापेठ पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव : नवीन बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या भजी गल्लीतून एकाची दुचाकी चोरणार्‍या संशयीत आरोपीला जिल्हापेठ पोलिसांनी कासमवाडी भागातून अटक केली. आरोपीकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली.

जिल्हा पेठ पोलिसात दाखल होता गुन्हा
जिल्हापेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलशन अशोक कुमार (वय-34) रा. सिंधी कॉलनी जळगाव यांची दुचाकी (चक 19 -थ 7088 काळे लाल नवीन बसस्थानका जवळील भजे गल्लीत मंगळवारी 22 मार्च रोजी दुपारी पार्किंग करून लावली असता अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने चोरटा मनिश अमरसिंग राठोड (26, रा.टिटवे, ता.सोयगाव, जि.औरंगाबाद) याला कासमवाडी परीसरातून दुचाकीसह अटक केली आहे.

यांनी केली कारवाई
तपासी अंमलदार हवालदार सलीम तडवी व गुन्हे शोध पथकातील पोलिस नाईक गणेश पाटील, हवालदार महेंद्र पाटील, समाधान पाटील, रवींद्र साबळे, विकास पहुरकर आदींनी ही कारवाई केली.