चोरीच्या पाच दुचाकींसह चोरटे जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात

जळगावसह नाशिकच्या पंचवटी भागातून दुचाकी चोरी केल्याची कबुली

भुसावळ/जळगाव : जळगाव शहरातून चार तर नाशिकच्या पंचवटी भागातून एक दुचाकी लांबवणार्‍या दोघा चोरट्यांच्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. ताब्यातील एक संशयीत असून दुसर्‍याचे नाव रुपेश संजय पाटील (साकरे, ता.धरणगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या ताब्यातून चोरी केलेल्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या असून संशयीताला जळगाव जिल्हापेठ पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

गोपनीय माहितीच्या आधारे अटक
जळगाव शहर व परीसरात दुचाकी चोरीचे सत्र सुरू असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांनी कारवाईने आदेश दिल्यानंतर जळगाव गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे रूपेश संजय पाटील व त्याच्या अल्पवयीन मित्रास ताब्यात घेतल्यानंतर संशयीतानी जळगाव शहर व जिल्हापेठ हद्दीतील प्रत्येकी दोन तर नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाणे हद्दीतून एक दुचाकी लांबवल्याची कबुली दिली. पाचही दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. संशयीताना अधिक तपासासाठी जिल्हापेठ पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय .अशोक महाजन, युनुस शेख, रमेश जाधव, पोलिस हवालदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, संदीप साबळे, राहुल पाटील, नितीन बाविस्कर, अविनाश देवरे, ईश्वर पाटील, प्रवीण मांडोळे, उमेश गोसावी, हेमंत पाटील, दीपक शिंदे, मुबारक देशमुख आदींनी ही कारवाई केली.