जळगाव । शहरातील गोलाणी मार्केटमधून गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सायकल चोरीला जाण्याच्या घटना वाढतच चालल्या होता. मात्र, या घटनांना आज शहर पोलिसांनी छडा लावत अल्पवयीन चोरट्यांकडून सहा सायकली हस्तगत केल्या आहेत. यातच या संशयित चोरट्यांकडून आणखी काही सायकल चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहेत.
बेकायदा पार्कींगमधील गाड्यांवर होती नजर
शहरात घराफोड्या, मोटारसायकल चोरी यानंतर आता सायकल चोरीला जाणाच्या घटनांमधध्ये वाढ होत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गोलाणी मार्केटमधील पार्किंगमधूनही गेल्या दोन ते तीन महिन्यात अनेक सायकली चोरीला गेल्या आहे. मात्र, याबाबत कुणीच पोलिस ठाण्यात तक्रार देत नसल्याने गुन्हाही दाखल नाही. दरम्यान, गोलाणीतील सायकल चोरीच्या घटना वाढतच असल्याचे लक्षात घेत शहर पोलिसांनी सायकल चोरट्यांचा शोध घेणे सुरू केला होता. या दरम्यानच, काही अल्पवयीन मुले सायकल चोरी करत असल्याची शहर पोलिसांना मिळाली होती.ट त्या आधारावर सोमवारी दोन अल्पवयीन मुलांना शहर पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता त्यांनी सायकली चोरी केल्याची कबुली देत त्यांनी लपवून ठेवलेल्या सहा सायकली काढून दिल्या आहे. दरम्यान, संशयित अल्पवयीन बालकांकडून आणखी काही सायकल चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.