जळगाव । तालुक्यातील उंदिरखेडे शिवारातील नागेश्वर मंदिराजवळ थांबलेल्या कळपातून 70 हजार रुपये किंमतीच्या 40 मेंढ्या चोरीस गेले होते. याप्रकरणी मेंढ पाळांनी पोलिसांत तक्रार केली होती. पोलीसांनी सहा जणांना अटक केली. त्यांना 10 जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली.
पोलिस पथकाने उंदिरखेडा येथील भिल्ल वस्तीतून यशवंत रामदास भील, बापू नथ्थू मोरे, धोंडू ओंकार ठाकरे, विनोद रतिलाल सोनवणे, राहुल शिवाजी वडर, रोहिदास रामदास भील या सहा जणांना ताब्यात घेतले आहे. उडणी दिगर येथील दोन जण फरार आहेत.09