चिंचवड – चोरीला गेलेले, गहाळ झालेले 114 मोबाईल फोन चिंचवड पोलिसांनी पकडले आहेत. त्यातील 36 मूळ मोबाईल मालकांना त्यांचे मोबाईल फोन परत करण्यात आले. चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेले आणि गहाळ झालेले 114 मोबाईल फोन चिंचवड पोलिसांनी हस्तगत केले.
हे देखील वाचा
त्या सर्व मोबाईल मालकांशी संपर्क करण्यात आला असून त्यातील 65 मोबाईलचे मूळ मालकांचा शोध लागला आहे. त्यातील 36 मोबाईल फोन परत करण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजित खुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव आदी उपस्थित होते.