चोरीस गेलेले मोबाईल मुळ मालकांना परत

0

नंदुरबार। जिल्ह्यातून जे मोबाईल गहाळ झाले होते, त्यांचा ट्रेस लावून स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने सर्व मोबाईल ताब्यात घेऊन ज्याचे मोबाईल होते त्यांना परत केले आहेत. पोलिस निरीक्षक किशोर नवले यांनी पत्रकार परिषदेत घेऊन पत्रकारांच्याच हस्ते संबधितांना ते मोबाईल परत केले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात पोलिस निरीक्षक म्हणून किशोर नवले हे नुकतेच रुजू झाले आहेत. सोमवार 28 आगस्ट रोजी त्यांनी शहरात चोरीस गेलेले मोबाईल जप्त केल्याची माहिती दिली.

सुमारे एक लाख रुपये किंमतीचे 50 हुन अधिक मोबाईल शोधून काढल्याचा दावा केला आहे. हे सर्व मोबाईल पत्रकारांच्या हस्ते तक्रारदारांना परत करण्यात आले. सध्या गणेशोत्सव सुरू असून सर्वत्र पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्न असून या उत्सवानंतर जिल्ह्यातील इतर गोष्टींचा आढावा घेणार आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागातील कर्मचार्‍यामध्ये ही बदल करू,अशी माहिती पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी यावेळी दिली.