पिंपरी : सांगवी पोलिसांनी 2008 ते 2016 या कालावधीत चोरीला गेलेल्या 22 दुचाकी जप्त केल्या आहेत. मात्र अद्याप या गाड्यांच्या मालकांनी वाहनांचा ताबा घेतला नाही. त्यामुळे गाड्यांची ओळख पटवून गाडी घेऊन जाण्याचे आवाहन सांगवी पालिसांनी केले आहे. येत्या सात दिवसात संबंधित गाड्यांच्या मालकांनी गाड्यांची ओळख पटवून गाडी घेऊन जावी अन्यथा या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे, असेही सांगवी पोलिसांनी सांगितले आहे.