चोरी तर केलीच… पण दुकानेही पेटविले

0

 

कृषी उत्पन्न बाजार समितील धक्कादायक घटना 

जळगाव– शहरातील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये 17 रोजी मध्यरात्री चोरट्यांनी बारदान व धान्य विक्रीची 2 दुकाने फोडुन दोन्ही दुकानांमधील एकूण एक लाख चाळीस हजार रुपयांची रोकड व 25 हजारांचे साहित्य असा एकुण 1 लाख 65 हजाराचा ऐवज लांबविल्याची घटना 18 रोजी सकाळी साडेसहा वाजता उघडकीस आली. विशेष म्हणजे चोरीनंतर दोन्ही दुकाने पेटवून चोरटे पसार झाले. त्यामुळे दोन्ही दुकानदारांचे आगीतही फर्निचर तसेच मालमत्तेसह इतर कागदपत्रे तसेच साहित्य खाक होवुन एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे .

शटरचे कुलूप, खिडकी तोडून चोरट्यांच प्रवेश
शाहूनगर येथील रहिवासी नंदलाल जीवनराम राठी यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीत दुकान नंबर 50 गुळांची लाईन येथे नंदलाल जीवनराम राठी , जीवनराम भगवानदास राठी व महेश नंदलाल राठी , प्रकाश सुभाषचंद्र डोडिया या नावाचे बारदान विक्रीचे तसेच धान्य विक्रीचे दुकाने आहेत . सतरा रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे दुकाने बंद करून राठी हे घरी परतले होते . मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे शटरचे कुलूप तोडून तसेच दुकानाच्या आत असलेली खिडकी तोडली व दुकानातील पाच हजारांची रोकड लंपास केली. चोरी केल्यानंतर चोरटयांनी राठी यांचे दुकान पेटवून गेले या आगीत साठ्यांचे बँकेचे चेक बुक्स जमा खर्च’ एलआयसीची कागदपत्रे दुचाकी चारचाकी वाहनांचे आरसी बुक इशुरन्स टॅक्स संबंधित कागदपत्रे तसेच दुकानातील फर्निचर एअरकंडिशनर इन्व्हर्टर व इतर साहित्य असे एकुण एक लाख रुपये किमतीचे साहित्य व कागदपत्रे जळून खाक झाली .

एसीसह सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआरही लांबविला
राठी यांच्या दुकानात प्रताप केल्यानंतर चोरट्यांनी राठी यांच्या रांगेत असलेल्या पुखराज अर्जुन प्रजापत यांच्या बारदान व धान्य विक्रीच्या दुकानाकडे मोर्चा वळवला . या दुकानाचाही चोरट्यांनी लोखंडी दरवाजा तोडून शोधात दुकानातून 1 लाख 35 हजार रुपये तसेच सीसीटीव्ही कॅमेराची हार्डिक्स’ डीव्हीआर, एलसीडी नेट राउटर असे एकुण 35 हजाराचे साहित्य असा 1 लाख 60 हजार किमतीचा ऐवज लांबविला. चोरी केल्यानंतर चोरटयांनी हे दुकानही पेटवून दिले आगीत या दुकानातील एअरकंडिशनर खुर्ची टेबल फर्निचर असे एकुण चाळीस हजार रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.

पोलीस निरिक्षकांसह कर्मचार्‍यांकडून पाहणी
बाजार समितीतील राठी यांच्या दुकानासमोरील दुकानदार राजेश प्रजापत यांनी शनिवारी सकाळी दुकान अर्धवट उघडे असून दुकानातून धुर निघत असल्याची माहिती मोबाईलवरून नंदलाल राठी यांना दिली. त्यानुसार राठी यांनी त्यांचे शालक प्रकाश डोडीया सोबत बाजार समितीकडे धाव घेतली. प्रकरणी नंदलाल राठी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या प्रकाराची माहिती मिळाल्यावर पोलीस निरिक्षक विनायक लोकरे यांनी तत्काळ कर्मचारी सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, मुद्दस्सर काझी, असीम तडवी यांच्यासह घटनास्थळाला भेट दिली असून याठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची तपासणी सुरु आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक संदीप पाटील हे करीत आहेत.