चोरीची दुचाकी घेवून फिरणारा अटकेत

0

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जळगाव – गेल्या अनेक दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात दुचाकीचे प्रमाण वाढले असल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशनसमोर चोरीची दुचाकी फिरविणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या रिक्षा स्टॉपजवळी बजाज कंपनीची लाल रंगाची बॉक्‍सर मोटारसायकल (एमएच 19 यू 3196) आरोपी गजानन प्रताप वानखेडे रा. कोथडी ता. मोताळा जि.जळगाव ह.मु. शनिपेठ जळगाव हा संशयीत रित्या फिरवत असल्याची माहीती एलसीबी विभागाला मिळाली.

गुप्त महितीनुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुनिल कुराडे यांनी सफौ मनोहर देशमुख, नुरोद्दिन शेख, पोहेकॉ रामचंद्र बोरसे, राजेंद्र पाटील, पोना सुरज पाटील, इंद्रिस पठाण, प्रकाश महाजन, रमेश चौधरी, चालक दर्शन टाकणे, पोना योगेश पाटील याबाबत माहिती दिली. त्यानुसार पथकाने कारवाई करत आरोपी गजानन वानखेडे ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता दुचाकी रावेर येथून चोरली असल्याची कबुली दिली. दरम्यान त्याला अटक करून रावेर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.