भुसावळ- गोरखपूर पनवेल एक्स्प्रेस गाडीतून महिलेची पर्स लांबविणार्या तामिळनाडूतील चार जणांच्या टोळीला लोहमार्ग पोलिसांनी पकडल्यानंतर या गुन्ह्यातील अन्य दोन संशयीतांच्या शोधासाठी जीआरपी पोलिसांचे पथक हे तामिळनाडूत जाणार आहे, चोरीतील मुद्देमाल हा त्या दोन्ही संशयीतांजवळच असल्याने त्यांचा शोध घेणे गरजेचे असल्याचे जीआरपी पोलिस निरीक्षक दिलीप गढरी म्हणाले. गोरखपूर पनवेल एक्सप्रेसच्या एसी कोच मधून पर्स घेऊन पळणार्या तामिळनाडू राज्यातील चार युवकांना लोहमार्ग पोलिसांनी अटक करुन 42 हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. या चोरी प्रकरणी संबंधीतांना त्यांच्या संशयास्पद हालचालीवरून जीआरपी पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडे 42 हजार रूपयांचा चोरीतील मुद्देमाल मिळून आला. मात्र त्यांच्या सोबतचे दोन जण पसार होण्यात यशस्वी झाले आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहे. संशयीत महेंद्र सत्यमूर्ति, मदन कुमार महेंद्रन, शिवा राजन आणि राजा आर मुगल (सर्व राहणार दि चिपळी तामिळनाडू) यांना अटक करण्यात आली आहे. या टोळीने रेल्वेत मोठ्या प्रमाणावर चोर्या केल्याचा संशय आहे.