चोरी प्रकरणी भोसरी पोलिसांकडून तिघांना अटक

0

भोसरी : भोसरी पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांच्याकडून 10 लाख 7 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे भोसरी पोलीस ठाण्यातील नऊ, निगडी, पिंपरी आणि खडकी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे साखळीचोरी, वाहनचोरी आणि घरफोडीचे एकूण 12 गुन्हे उघड झाले आहेत. संगतसिंग अजमेरसिंग कल्राणी (वर 33, रा. हडपसर), सचिन केरुनाथ पारधे (वर 31, रा. चिंभळी, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर एक अल्पवयीन तरुणाला ताब्यत घेणयात आले आहे.