चोपडा। चोपडा सहकारी साखर कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे अतुल ठाकरे चेअरमन तर भाजपचे शशिकांत गुलाबराव देवरे यांना संधी मिळाली आहे. गुरूवार 20 जुलै रोजी दुपारी 1 वाजता चोपडा कारखान्याच्या आवारात जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक झाली. तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी ही दोन्ही नावे निश्चित केल्यानुसार आजची निवडप्रक्रिया झाली.
निवडप्रक्रियेत या संचालकांनी घेतला सहभाग
निवडणुकीत चेअरमन अतुल ठाकरे यांच्या अर्जाला सूचक प्रवीण गुजराथी तर व्हाईस चेअरमन यांच्या उमेदवारी अर्जावर अनिल पाटील हे सूचक होते. यावेळी संचालकमध्ये माजी चेअरमन नीता पाटील, आनंदराव रायसिंग, प्रवीण गुजराथी, सुरेश पाटील, आत्मराम म्हाळके, निलेश पाटील, जितेंद्र पाटील, सुनील महाजन, कांतीलाल पाटील, अनिल पाटील, प्रदीप वसतराव पाटील, प्रदीप पाटील ,भरत पाटील, भरत जाधव, गोपाळ धनगर, सुरेखा पाटील, अॅड. एस.डी.पाटील यांची उपस्थिती होती. सहकार क्षेत्रात मोडकळीस आलेली परिस्थिती असतांना या क्षेत्रास नवसंजिवनी देण्याचा प्रयत्न चोसाकाच्या माध्यमातून होण्याचा आशावाद बाळगत अवघ्या सहकार क्षेत्रातील दिग्गजांचे या निवडणूकीकडे लक्ष होते.