चोपडा – चोसाका गेल्या महिन्यात 19 तारखेला पुजन करुन सुरू करण्यात आला मात्र साखर कारखान्याचे भाव जाहीर न केल्यामुळे उस उत्पादक शेतकरी सभ्रमात होते त्यासाठी आज चोसाकाचे सर्व पक्षीय नेत्यानी घनश्याम अग्रवाल यांच्या निवासस्थानी पञकार परीषद घेण्यात आली यावेळी उसाला 1800 रुपये भाव जाहीर करण्यात आला असुन उर्वरीत 300 रुपये नंतर देण्याचे पत्रकार परीषेद घनश्याम भाऊ अग्रवाल यांनी सांगितले.
तालुक्यातील उस बाहेर जावू देणार नाही
कन्नड, मुक्ताईनगर, मधुकर, संजीवनी, अशोक श्रीरामपुर हे कारखान्यांनी तालुक्यात अनधिकृत उसतोड सुरू केल्या असुन दररोज 1400 ते 1500 मे. टन उसतोड करून परस्पर वाहतूक करीत आहे ही उसतोड थांबवणे गरजेचे आहे तरच चोसाका उस गाळप 1 लाख मे. टनाचे होवु शकेल परंतु मधुकर, कन्नड, स.सा.का. यांनी 2100 रुपये प्रति मे. टन जाहीर करून राजरोसपणे तालुक्याच्या ऊस नेऊन जात आहे. ही तोड थांवण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी सहभाग घेतला. यावेळी माजी आमदार कैलास पाटील, घनश्याम अग्रवाल, अॅड. संदिप पाटील, चेअरमन निता पाटील यांची अनुपस्थिती होती तर त्यांचे पती संभाजी पाटील होते तसेच संचालक प्रविण गुजराथी, प्रदिप पाटील, सुनिल महाजन, अनिल पाटील, अॅड. एस.डी. सोनवणे असे पाच संचालक उपस्थित होते. इतर संचालक यांची अनुपस्थिती होती.
प्रथम हप्ता 15 दिवसांनी
चोसाकाचे कामकाजा बद्दल इतर संचालकांमध्ये नाराजी असल्याचे समजते उपस्थित संचालक यांनी 2100 रुपये प्रति मे. टन गळीत हंगाम 2016/17 साठीभाव जाहीर केला असुन त्यापैकी प्रथम हप्ता 1800 रुपये प्रति मे. टन प्रत्येक 15 दिवसांनी दिला जाणार आहे तसेच उसतोड व वाहतूक कंत्राटदार हगांमी कामावर असलेले कंञाटदार, कर्मचारी यांना नियमितपणे पगार दिले जातील असे यावेळी सांगितले.