पाचोरा । पाचोरा येथील जारगांव चौफुलीवर दि. 17 रोजी झालेल्या दुर्घटनेत दोन तरुणांना अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. तर दोन वृध्द जखमी झाले आहेत. हा अपघात येथील असलेल्या अतिक्रमण व अवैध वाहतुकीमुळे झाला असुन यात सार्वजनिक बांधकाम विभाग, ट्रक चालक व या घटनेत दोषी असणारे सर्व जणांवर निपक्षपातीपणे चौकशी करुन तात्काळ सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अशा आषयाचे निवेदन पाचोरा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पाचोरा पोलिसात देण्यात आले आहे.
निवेदन देतांना यांची होती उपस्थिती
पाचोरा शहरातील एम.एम.महाविद्यालय चौक, भारत बस थांबा या सारख्या ठिकाणचे अतिक्रमण ही कायमस्वरुपी तात्काळ काढावे, विविध चौकांच्या ठिकाणी वाहतुक पोलिसांची कायमस्वरुपी नियुक्ती व बंद अवस्थेत असलेले शहरातील सिग्नल सुरु करण्यात यावेत अशा विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. निवेदन देतांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष अरुण पाटील, करण सुर्यवंशी, उमेश एरंडे, शुभम शिंदे, प्रशांत पाटील, रितेश शिंपी, रुषीकेश चौधरी, नेताजी पाटील, शाम पाटील, पुरुषोत्तम पाटील, अनिल पाटील, योगेश कुमावत सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.