चौकीत पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई

0

महामार्गावर अडथळा करणारी वाहने मोकाट

वाघोली । पुणे-नगर महामार्गावर वाहतुकीला अडथळा करणार्‍या खासगी वाहनांवर किंवा वाघोली पोलीस चौकीसमोरच अवैध प्रवासी वाहनावर जॅमर लावून कारवाई करण्याऐवजी पोलीस चौकीच्या मोकळ्या जागेत वाहने पार्क केलेल्या दुचाकी व चारचाकींना जॅमर लावून मंगळवारी सकाळी लोणीकंद पोलिसांकडून कारवाई केली जात होती. केसनंद फाटा येथे वाहने पार्क करण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने वाहनचालक पोलीसचौकीच्या आवारातच मोकळ्या जागेत वाहने पार्क करीत असतात. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे महामार्गाच्या कडेला अडथळा निर्माण करून लावल्या जाणार्‍या गाड्यांवर कारवाई करण्याऐवजी चौकीच्या आवारातील गाड्यांवर कारवाई केली जात होती. चोर सोडून संन्यासालाच पकडण्याचा प्रकार सुरू असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून येत होत्या.