चौगावसह आव्हाणीतील दुचाकी चोरटा जाळ्यात : चोरीच्या 26 दुचाकी जप्त

Thieves With 26 Stolen Bikes in Jalgaon City Police Net जळगाव : चोरीच्या तब्बल 26 दुचाकींसह दोन दुचाकी चोरट्यांना जळगाव शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. तुळशीराम कोळी (19, चौगाव, ता. चोपडा, जि.जळगाव) व पवन प्रेमचंद पाटील (26, रा.आव्हाणी, ता.धरणगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव शहर पोलिस ठाणे हद्दीत सातत्याने दुचाकींची चोरी होत असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दुचाकी चोरट्यांचा बंदोबस्ताचे आदेश दिले होते.जळगाव शहरचे पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांनी पथकाला आदेश दिल्यानंतर पथक संशयीतांच्या मागावर होते. सुरुवातीला गुरुवार, 15 सप्टेंबर रोजी संशयीत दुचाकी विक्रीसाठी आल्यानंतर दाणा बाजारातून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. संशयीताने आपले नाव तुळशीराम कोळी (19, चौगाव, ता. चोपडा, जि.जळगाव) सांगत चोरीच्या 15 दुचाकी काढून दिल्या तर आपला साथीदार पवन प्रेमचंद पाटील (26, रा.आव्हाणी, ता.धरणगाव) याच्याकडेदेखील चोरीच्या दुचाकी असल्याची माहिती दिल्यानंतर त्यासदेखील अटक केल्यानंतर 11 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या.