शिंदखेडा। तालुक्यातील चौगाव येथे दि.23 रोजी झालेल्या किरकोळ वादातून एकाला जबर मारहाण केल्याची घटना दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. या मारहाणीत त्याच्या डोक्यात दगड टाकुन जखमी करण्यात आले. याप्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आंबादास तोताराम शिंदे 30 रा.चौगाव याला युवराज पवार हा घरी घेऊन जात होता.
त्यावेळी युवराज हा एका घरासमोर पडला. त्याला आंबालाल याने उचलले. मात्र त्याचा राग आल्याने संशयित रतीलाल नाना कोळी,किशोर काळी, राहुल पोपट कोळी, सखुबाई नाना कोळी, यांनी आंबादास शिंदे याला मारहाण करून डोक्यात दगड मारून डोके फोडून जखमी केले. त्यामुळे आंबादास शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दखल करण्यात आला. पुढील तपास हे.कॉ.खेडवत करीत आहेत.