जळगाव ।हरिविठ्ठलनगरात गेल्या महिन्यात झालेल्या दंगलप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांच्या पथकाने चार संशयितांना अटक केली होती. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
हरिविठ्ठलनगरात 11 फेब्रुवारीला झालेल्या दंगलीत कैलास हटकर, प्रमोद इंगळे, ललित देवरे आणि हर्षल सोनवणे या संशयीताना पोलिसांनी 2 अटक केली होती. त्यांच्या कोठडीची मुदत मंगळवारी संपली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली.