धुळे । जम्मु येथे कठुआ गावात एका मुस्लिम समाजाच्या अल्ववयीन मुलीवर चार नराधमांनी मंदिरा सारख्या पवित्रस्थानी कोंडून अत्याचार केला. एवढ्यावरच ते नराधम थांबले नाहीत तर त्यांनी आठ वर्षाच्या त्या चिमुरडीचे हातपाय तोडले व दगडांनी चेहरा ठेचून काढला. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून या घटनेचा निषेध विविध संघटनांतर्फे करण्यात येत आहे. यात जमाअते उलमा धुळे संघटना व समाजवादी पार्टीतर्फे तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला चौघा नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीचे निवेदनही देण्यात आले.
समाजवादी पार्टीतर्फे निषेध
या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी तसेच आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी जिल्हा प्रशासनाला समाजवादी पार्टीतर्फे निवेदन देण्यात आले. समाजवादी पाटीतर्फे दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, दोन्ही प्रकरणातील आरोपींवर जलदगती न्यायालयात प्रकरण चालविण्यात यावे निपक्षपणे कारवाई होऊन नराधमांना सार्वजनीक ठिकाणी फासावर लटकविण्यात यावे. निवेदनावर अकिल अन्सारी, जमिल मन्सुरी, अमिल पटेल, इनाम सिद्दीकी, आलमगीर गोरख शर्मा, गुलाम कुरेशी, अकिल शाह, रशीद शाह, सिमा चौहान, जाकीर खान, नविद अख्तर, राहुल भामरे, आसिफ पठाण, इकबाल तांडा, वसिम कुरेशी, रहिम शेख, सादिक असलम, शकील एच.अन्सारी, इरफान शाह, आवेश सिद्दीकी, बुर्हान शेख, आझाद पहेलवान, शबाना शाह, गफ्फार शाह, निहाल अन्सारी, नवाब खान आदींची नावे आहेत.
यांच्या आहेत स्वाक्षर्या
निवेदनावर जिल्हाध्यक्ष हाफिज कासनी, धुळे शहराध्यक्ष मौलाना जियाउर्रहमान, मौलाना शकील कासमी, मौलाना आबिद कासमी, मुफती शफीक कासमी, मौलाना हिलाल कासमी, मौलाना शोएब कासमी, हाफिज अब्दुर रहेमान, हाफिज कलाम, हाफिज जाकिर यांच्यासह मो.उमैर मो.शव्वाल अन्सारी,मुफ्ती खलिलर्रहमान, मौलाना मूबीन, मौलाना अब्दुल्ला, मौलवी इमरान, हाजी इस्माईल पठाण, हाजीफ मो.सुल्तान, मोहम्मद आरीफ अरश, मोहम्मद सलिम,एजाज रफिक, शेख इमरान, निलेश काटे, रफिक शाह, शोएब अन्सारी, अब्दुल मेकानिक, मोहम्मद वकिल, अहमद भाई, हाजी साबीर शेठ, हाजी शव्वाल मो.अमीन, शेख परवेजभाई यांच्या स्वाक्षर्या आहे.