चौथीपर्यंतचे शालेय अभ्यासक्रम डिजीटल होणार

0

जळगाव । आधुनिक काळ हे डिजीटलचे युग असल्याने डिजीटल शिक्षणावर अधिक भर देण्यात येत आहे. खाजगी शाळांसोबतच जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांना डिजीटल शिक्षक मिळावे यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी देखील डिजीटल अभ्यासक्रमावर भर देण्याचे ठरविले आहे. 1 ली ते 4 थीच्या वर्गातील अभ्यासक्रम डिजीटल होणार आहे.

संगणक ज्ञान असलेले शिक्षक
अभ्यासक्रमाच्या निर्मितीसाठी संगणकाचे ज्ञान अवगत असलेल्या 600 टेक्नीसिव्ह शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. शिक्षकांकडून पुस्तकातील अभ्यासक्रम पीडीएफ तसेच पेन ड्राईव्हमध्ये डिजीटल स्वरुपात तयार करण्यात येणार आहे. डिजीटल अभ्यासक्रमासाठी कार्यशाळा घेण्यात आली. प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, उपशिक्षणाधिकारी डी.डी.देवांग, विस्तार अधिकारी खलील शेख आदींसह शिक्षण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.